लाईफ संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उपक्रम ; स्वेटर आणि खाऊ देऊन आनंदोत्सव

पुणे (पुणे सुपरफास्ट न्यूज):-
            पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षानुवर्षे वणवण भटकणारा समाज... या चौकटीतून बाहेर पडण्यासाठी नव्या पिढीने घेतलेला ध्यास... आपल्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने रंगवित कडाक्याच्या थंडीत मोकळ्या आकाशाखाली राहणारे हे विद्यार्थी असे चित्र आजही पुण्यामध्ये दिसत आहे. त्यामुळे या समाजातील मुलांना सांताक्लॉजकडून स्वेटर आणि खाऊ भेट देऊन लाईफ संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत आनंदोत्सव साजरा केला.
        निमित्त होते, ख्रिसमस आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसाचे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदेश दांगट, लाईफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओंकार कोंढाळकर, संस्थापक समीर इंदलकर, पोतराज समाजासाठी काम करणा-या सहयाद्री मेडिकल अ‍ँड एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मराज साठे, आदित्य जोशी, प्रज्वल कोंढरे, राजश्री पवळे, सौरभ महामुनी, राकेश गायकवाड, अथर्व ढमाले, भरत सवडे, सोहम इनामदार, स्नेहल नारकर, श्रीया देव, भूषण पवार आदी उपस्थित होते.
       जिंगल बेल... जिंगल बेल असे म्हणत पर्वती जलशुद्धीकरण केंद्राशेजारी असलेल्या पोतराज समाजाच्या वस्तीमध्ये सांताक्लॉजने प्रवेश करताना चिमुकल्यांच्या चेह-यावर हसू उमलले. एरवी रस्त्यावरील फ्लेक्समधून सांताक्लॉजचे चित्र पाहिलेल्यांच्या भेटीला आज प्रत्यक्ष सांताक्लॉज आल्याने उत्साहाचे वातावरण होते. सांताक्लॉजला शेक हँड करत खाऊ घेण्याकरीता चिमुकल्यांनी गर्दी केली. तर थंडीपासून लहानग्यांचे संरक्षण व्हावे, याकरीता सांताक्लॉजने त्यांना स्वेटर घातले. ओंकार कोंढाळकर यांनी प्रास्ताविक केले. समीर इंदलकर यांनी आभार मानले. 
                                                                                                           ओंकार कोंढाळकर
                                                                                                           ( मो. ८३८१०१८०१८)



 
Top