पुरंदर (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणुन ओळख असणा-या पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील भुलेश्वर मंदिर जीर्णोध्दाराचे काम रखडले असुन मंदीराभोवती पडलेल्या साहीत्यांचा येथे येणा-या भाविकांना नाहक ञास सहन करावा लागतो यामुळे भुलेश्वर मंदीराचे राहीलेले काम कधी पुर्ण होणार याचे उत्तर आजही सापडले नाही.
भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने ऑगस्ट २०१३ मध्ये भुलेश्वर मंदीराचे काम सुरु करण्यात आले. भुलेश्वर भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.भुलेश्वर मंदीर पुरातन असल्याने येथील शिल्प सौंदर्य पहाण्यासाठी या ठिकाणी दररोज अनेक भाविक येतात. येथील जिर्ण अवस्थेत असलेली शिखरे दुरुस्त करण्यासाठी पुरातत्व विभागाने मंदीराच्या शिखर दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. एरवी मंदीरापासुन काही अंतरावर साधा फुटभर खड्डा खोदु न देणा-या पुरातत्व विभागाने चुना भिजत घालण्यासाठी चक्क भली मोठी टाकीच खोदली. तेही भुलेश्वर मंदीराला अगदी खेटुन, मग यामुळे मंदीराला धोका निर्माण का झाला नाही? माळशिरस ग्रामस्थांना तिनशे मिटर पर्येत काहीही करु देत नाही. या टाकी शेजारी लहान दोन टाक्या तयार करण्यात आल्या. मंदीराच्या पाठीमागे चुना मळण्यासाठी जुण्या पद्धतीने घाणा तयार केला. अशा प्रकारे एक नव्हे अनेक खोदकाम करण्यात आले.
दरवर्षी श्रावण महीण्यात श्री क्षेत्र भुलेश्वराची याञा भरते. या याञेत ढोल ताश्यांच्या गजरात खेळगडयांच्या संगतीत कावड मिरवणुक,व भजनाच्या तालावर पालखी मिरवणुक काढण्यात येते. यावेळी येथे लाखो भाविक येतात.कावड व पालखी मिरवणुक मंदीराला प्रदक्षिणा घालतात.यावेळी ग्रामस्थांना या मार्गावरील मंदीरालगत खोदलेल्या टाक्यामुळे नाहक ञास सहन करावा लागला. सध्या मंदीराच्या मुख्य शिखराचे काम जवळपास पुर्ण झाले आहे.उर्वरीत दोन शिखरांची कामे होणे बाकी आहे.मंदीरातील लाकडी बांबु जरी बाजुला केले असले तरी खोदलेल्या टाक्या आजही जशाच्या तश्या आहेत. कासवाच्या गतीने चाललेले काम पुर्ण कधी होणार हा प्रश्न येथील ग्रामस्थांना व या ठिकाणी येणा-या भाविकांना पडला आहे.मंदीराच्या उत्तरेकडील बाजुला शेड उभारुन चुना ठेवला आहे.शेड लहान मंदीराच्या जवळ केल्याने मंदीरात दर्शन घेण्यासाठी भाविकांना अडचन होते.
भुलेश्वर मंदिरात दर्शनासाठी पुणे परिसरातील भाविक दर सोमवारी येतात . व वहाण तळ परिसरात असणा-या वाळु व दगडाच्या ढिग वापरण्यावाचुन पडुन आहेत. मंदिरात खिडक्या कामासाठी पुरातत्व विभागाने मंदीराच्या पश्चिम वत उत्तर बाजुला दगडी काढले आहेत.त्याठिकाणी खिडक्या माञ बसवण्यात आल्या नाही. मंदीरासमोरील तुळशी वृन्दावन हटवण्यात आले आहे.त्याचे कामही करण्यात आले नाही. यामुळे सध्या या ठिकाणी अनेक समस्या आहेत. शासणाच्या क दर्जा मध्ये असणारे हे मंदीर शिल्पसौदर्याचा खजीना आहे माञ आजही या ठिकाणी साधे सौचालयही नाही. पुरुष भाविकांबरोबरच महीला भाविक या ठिकाणी अधिक येतात.यांची माञ कुचंबना होते. याकडे कोणीही लक्ष देत नाही.पुरातत्व विभाग व ग्रामस्थ यांच्या वादामुळे येणा-या भाविकांना नाहक ञास सहन करावा लागतो. यामुळे मंदीराचे काम होणार तरी केव्हा हा प्रश्न आजही भाविकांना पडला (प्रतिनिधी - विनय गुरव)