पुरंदर (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथील श्री गणेश विलास ढोले यांची भुलेश्वर शुगर्सच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली.त्यांना निवडीचे पत्र कारखाण्याचे संस्थापक चेअरमन श्री हनुमंत भगत यांनी त्यांना दिले.
यापुर्वी गणेश ढोले हे यवत येथील अनुराज शुगर साखर कारखाण्यात शेतकी विभागात अधिकारी म्हणुन काम केले आहे.भुलेश्वर साखर कारखाण्याच्या उभारणीत त्यांचे कार्य महत्वाचे आहे.साखर कारखाण्याच्या शेअर्स उभारणीसाठी वेळ देऊन शेअर्स जमा करण्याचे चांगले काम केले.यासंदर्भात श्री भुलेश्वर साखर कारखाण्याचे संचालक व श्री भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव म्हणाले कि साखर कारखाण्याचा चांगला अनुभव असल्याने कारखाण्याला निश्चितच मदत होईल. नवनिर्वाचित संचालक गणेश ढोले म्हणाले की चेअरमन व संचालक मंडळांनी दिलेली जबाबदारी पार पाडुन साखर कारखाना व उसउत्पादक शेतकरी यांच्यामध्ये आपुलके असणारे नाते अधिकच घट्ट करुन ऊस उत्पादकांना उत्पादन वाढीसाठी शेतातच मार्गदर्शन करणार आहे. (प्रतिनिधी - विनय गुरव)