दिल्ली (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये हवा
प्रदूषणाची स्थिती वाईट असून दरवर्षी त्यामुळे १० ते ३० हजार
लोकांचा मृत्यू होतो, असे
सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायर्नमेंट (सीएसई) संस्थेच्या अहवालात
म्हटले आहे. बॉडी बर्डन २०१५- स्टेट ऑफ इंडियाज हेल्थ या
अहवालानुसार हवामान बदलामुळे टोकाच्या हवामान विषयक घटना घडत आहेत. पर्यावरण
व आरोग्य यांचा संबंध स्पष्ट करणाऱ्या या अहवालात म्हटले आहे की,
वाहने व
औद्योगिक कारखाने तसेच इतर कारणांमुळे हवेचे प्रदूषण होत आहे.
गेल्या दहा वर्षांत जगामध्ये हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूत ३००
टक्के वाढ झाली आहे. ही संख्या २००० मध्ये ८ लाख होती ती २०१२ मध्ये ३२ लाख
झाली. नवी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर असून दरवर्षी १० ते ३०
हजार मृत्यू होत आहेत. जगात मृत्यूची जी दहा महत्त्वाची कारणे आहेत त्यात
हवा प्रदूषण हे महत्त्वाचे कारण आहे.
राज्यांमधील आकडेवारीनुसार मलेरियाचा वर्षांतील कालावधी वाढला असून तो १०-१२ महिने म्हणजे संपूर्ण वर्षभरच झाला आहे. कोलकात्यात डेंग्यू पसरण्याचा कालावधी ४४ आठवडे आहे. ५२ आठवडे तापमानात २.४ अंश सेल्सियस वाढण्याचा कल आहे. त्यामुळे डेंग्यूचा धोका वाढतो. आंध्र प्रदेश व ओदिशात उष्णतेच्या लाटेने ६०० लोक मरण पावले आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर तोडगा काढणे आवश्यक असते.