नवी दिल्ली (पुणे सुपरफास्ट न्युज-वृत्तसंस्था) -
अफगणिस्तानला शुक्रवारी
मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास बसलेल्या भूकंपाचे धक्के उत्तर भारतातही जाणविले.
या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे.
अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने
दिलेल्या माहितीनुसार, अफगणिस्तान आणि ताजिकिस्तानच्या
सीमेवरील फैजाबाद येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचे धक्के
पाकिस्तानमध्येही बसले आहेत. पाकिस्तानमध्ये 40 जण जखमी असल्याचे
वृत्त आहे. सुमारे 30 सेकंद भूकंपाचे धक्के जाणविल्याने
नागरिक रस्त्यावर उतरले होते. इस्लामाबाद, रावळपिंडी,
लाहोर, पेशावरसह भारताची राजधानी दिल्लीसह
जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाना राज्यांत काही शहरांना भूकंपाचा धक्का
बसला.
