पुणे (पुणे सुपरफास्ट न्युज) - 
              उत्तर भारतात थंडीची लाट असल्याने तेथून गार वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम पुण्यातील तापमानावरही झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडीने गारठलेल्या पुण्याचे किमान तापमान सरासरीपेक्षा 3.2 ने कमी होऊन, 7.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. दिवसाच्या तापमानही 2.9 अंश सेल्सिअसने कमी होऊन 25.8 झाले.
  राज्यात थंडीच्या लाटेची तीव्रता वाढली असून, पुण्यात या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत नोंदलेल्या तापमानात झाली.तरी सर्वांनी ह्या बोचऱ्या वाचण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. 

 
Top