जिल्हा स्तरावर निवड
माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्युज) -
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित तालुका स्तरिय नाट्य स्पर्धेत पुरंदर तालुक्यातुन न्यु इंग्लिश स्कुल गुरोळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'ओझं ' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावल्याचे मुख्याध्यापक रामदास जगताप यांनी सांगीतले.
"ओझं" या नाटकातील संकेत यादव या विद्यार्थ्यांस उत्कृष्ट अभिनय व सहशिक्षक मनोहर आंबले यांना उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पारितोषिक मिळाले.
सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारे व पालकांच्या मुलांकडुन असणा-या अवास्तव मागण्या व त्यांचे मुलांवर होणारे दुष्परिणाम दाखवुण समस्त पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यात ओध हे नाटक यशस्वी झालेल आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक जितीन कांबळे यांचे हस्ते करण्यात आले.अध्यक्ष स्थानी कृषी व पशु संवर्धन विभागाच्या सभापती सारिका इंगळे होत्या. यावेळी सभापती सारिका इंगळे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील मुले क्रिडा, कला, अभिनय या क्षेत्रात पुढे यावीत यासाठी पुणे जिल्हा परिषद ४६ वर्षे असे प्रोत्साहन पर उपक्रम राबवीत आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.यावेळी माजी उपसभापती माणिकराव झेंडे , सदस्य दत्ता झुरंगे, शंकरराव कामथे , बाळासाहेब कामथे, आत्माराम कामथे, बळवंत गरुड , सरपंच सुनिता इंगळे, उपस्थित होते.
(प्रतिनिधी -विनय गुरव)