विशेष प्राविण्य गटासाठी निवड
माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्युज) -
              लोकनेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त शरद मल्हार प्रतिष्ठान पुणे, जिल्हा परिषद पुणे ( माध्यमिक विभाग ) आयोजित शरद मल्हार आंतरशालेय लोकनृत्य स्पर्धेत आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान संचलित न्यु इंग्लिश स्कुल गुरोळी ता. पुरंदर विद्यालयातील लहान गटाचा पुरंदर तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याचे मुख्याध्यापक रामदास जगताप यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी तालुक्यातुन ३९ शाळांनी सहभाग घेतला होता. गुरोळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मार्तंड मल्हार हे नृत्य अप्रतिम रित्या सादर करुन प्रेक्षकांची तसेच परिक्षकांची मने जिंकली. या नृत्याची  विशेष प्राविण्य गटामध्ये निवड झाली आहे.
    जिल्हा पातळीवर होणा-या स्पर्धा गणेश कला क्रिडा मंच पुणे येथे होणार असल्याचे संयोजिका वैशाली नागवडे यांनी यावेळी सांगीतले. बक्षिस वितरण वैशाली नागवडे, सभापती गौरीताई कुंजीर , कलाताई फडतरे यांचे हस्ते करण्यात आले.
        विद्यालयातील विद्यार्थ्यांना सहशिक्षक सचिन घोलप, प्रदिप खेडेकर, अरुण यादव, शरद चौधरी, हरिश्चंद्र खेडेकर, मनोहर आंबले , छगन खेडेकर, सुनिल बधे, राहुल जाधव, प्रदिप काळे यांनी मार्गदर्शन  केले.
     विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजयदादा कोलते, सचिव शांताराम मेमाणे, सरपंच रामचंद्र खेडेकर, माऊली मेमाने, धर्माजी खेडेकर, हिरामण खेडेकर, संपत खेडेकर, गौरव खेडेकर , उत्तम खेडेकर, तानाजी खेडेकर, विलास जगताप, जयसिंग भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
(प्रतिनिधी -विनय गुरव)

 
 
Top