पुणे
(पुणे सुपरफास्ट न्यूज) -
चिटफंड गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)
मोठी कारवाई करत समृद्ध जीवन कंपनी आणि या कंपनीचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या
विरोधातील फास आवळण्यास सुरवात केली आहे. या प्रकरणी सीबीआयने आज महाराष्ट्र आणि
ओडिशातील 58 ठिकाणी छापे टाकले. "समृद्ध जीवन‘चे संस्थापक मोतेवार यांच्यासह कंपनीशी संबंधित एकूण सहा व्यक्तींच्या
निवासस्थाने आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआयने दिली. चिटफंड
गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयने दोन गुन्हे दाखल केले असून, त्या
आधारे आजची कारवाई करण्यात आली.
समृद्ध जीवन समूहाची मालकी असलेली
हिंदी वृत्तवाहिनी "लाइव्ह इंडिया‘ आणि मराठी वृत्तवाहिनी "मी मराठी‘च्या
कार्यालयांवरही छापे टाकण्यात आल्याचे सीबीआयतर्फे स्पष्ट करण्यात आले.
"लाइव्ह इंडिया‘, "मी मराठी‘सह
इतर क्षेत्रीय वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करूनही त्यांनी छाप्यांबाबत
कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
