जेजुरी (पुणे सुपरफास्ट न्युज)
                जेजुरी लोककला संस्कृती चे माहेर घर असून खंडोबाच्या दरबारात कलावंतानी आपली लोककला सादर करीत तर खंडोबा भक्त जेजुरीकरांनी भव्य दिव्य रांगोळ्या काडीत देवदिवाळी साजरी करत चंपाषष्ठीची  सांगता झाली
       खंडोबा गडावर गेली अठरा वर्ष येथील पुजारी सेवक कर्मचारी मंडळाच्या वतीन चंपाषष्ठी उत्सवाच्या सहा दिवसाच्या कालावधीत लाखो भाविकांना मोफत अन्नदान करीत असतात तर धार्मिक विधीच्या माध्यमातून फुलांची आकर्षक सजावट . सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यात पहिल्या दिवसापासून सांप्रदायिक ते जागरण गोंधळ लोककला असे कार्यक्रम  सादर केले जातात तर जेजुरी येथील  जयाद्री मित्र परिवार व एकता ग्रुपच्या कु पूजा गोसावी ,निकिता प्रभाळे.सायली ,मेघना गोसावी भगिनींनी  भव्य अशी खंडोबाच्या देव दिवाळी निमित्त रांगोळी काढण्यात आली होती  घरा  घरातून तळीभंडारा  ,कुलधर्म कुलाचार केले जातात गडावर भजन कीर्तन निरुपम खंडोबा कथा असे कार्यक्रमाने सांगता झाली. (विजयकुमार हरिश्चंद्रे)  



 
 
Top