आळेफाटा (पुणे सुपरफास्ट न्यूज) - 
         आज  आळेफाटा येथे शेतकरी  आणि जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील  नागरिकांच्या असणाऱ्या अनेक अडचणीचा प्रशासनाने विचार करत नसल्याने सत्तेत असनाऱ्या  शिवसेना पक्षाच्या युवा सेनेच्या वतीने आणि या युवा सेनेचे जिल्हा  अध्यक्ष मा.गणेशभाऊ कवडे यांच्या नेतृत्वाखाली आणि  जि.प.सदस्य मा.माऊलिशेट खंडागळे, गटनेत्या सौ.आशाताई बुचके तसेच  सेनेच्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हे  रस्ता रोको आंदोलन घेण्यात आले.
   ह्या आंदोलनचा  प्रशासनाणे गंभीर रित्या दाखल न घेतल्यास सेना पुन्हा  आंदोलन करेल अशा देखील भावना  युवा सेनेच्या अध्यक्षांनी  व्यक्त केल्या . या रस्ता रोको आंदोलानाची   सुरुवात दि २१ रोजी सकाळी ११.वा. युवा सेनेच्या अध्यक्षांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाली                                                                       
          अध्यश  भाषणात गटनेत्या सौ.आशाताई बुचके यांनी प्रशासनाने शेतकरी व  नागरिक व  व्यापारी यांच्या भावनांचा विचार न केल्याने होणाऱ्या अडचणी म्हणजेच आळे गावातील पाणीपुरवठा,नगर-कल्याण महामार्गाच्या रुंदानिकणामुळे होणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी. या महामार्गाच्या रुदानिकारणामुळे ठेकेदारच्या निष्काळजीपणामुळे  अपघात वाढत आहे त्याचा देखील विचार करावा
           पुणे-नाशिक महामार्गांच्या रुंदानिकरनाच्या कामात जानाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव तसेच त्या जमिनींचे पैसे  त्वरित  मिळण्याची मागणी,पुणे-नाशिक महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या चाळकवाडी  या  टोल नाका उभारणी नंतर   शेतमालाला दळण वळण यासाठी होणारी अडचनि  यावर मार्ग काढून देणे ,
           त्याच प्रमाणे कांद्याला योग्य तो  भाव मिळावा,आणि त्याचप्रमाणे शेतकार्यांचा असणारा सेटसाठी असणारा जोड व्यवसाय म्हणजे दुध व्यवसाय  आणि दुधाला योग्य भाव मिळावा  दुष्काळ ग्रस्त परस्थितिचा  विचार करून तालुक्यातील असणारया  धरणांतील  पाणी साठ हा   जुन्नर तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या पिण्याचा पाण्यासाठीच राखून ठेवावा . अशी मागणी. गटनेत्या सौ.बुच्केताई आणि जी. प. सदस्य माऊली खंडागळे यांनी प्रशासनाकडे केली. व या संधर्भात आंदोलनकर्त्यांनी   तःशिलदार मा.हिरामणी आणि पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांसकडे सुपूर्त केले.
                   युवा  सेना जिल्हा अध्यक्ष मा. गणेशभाऊ कवडे यांच्या नेतृत्वाखाली झाले या रस्ता रोको आंदोलनामध्ये मान्यवर मंडळी बरोबर शिवसेना उप जिल्हा प्रमुख मा. शरद आणा चोधरी ,बाळासाहेब पाते, शेतकरी संघटनेचे अजितदादा वाघ ,सभापती -संगीताताई  वाघ कृषी.ऊ .बाजार समिती सदस्य आनंदभाऊ रासकर संतोश्नाना खैरे ,मधुकर काजळे ,संजयशेट गाढवे,उपतालुका प्रमुख -संदीप लेंडे मिन्नाथजी शिंदे, गणेश गुंजाळ त्याच प्रमाणे सेनेचे  अनेक कार्यकते  त्याचप्रमाणे स्थानिक  नागरिक, व्यापारी ,आणि शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात  सहभाग घेतला. 
              त्याचप्रमाणे अधिक माहिती देताना युवा सेनेचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष मा.गणेश भाऊ कवडे यांनी या रस्ता रोको मध्ये सहभागी झालेय सर्व नागरिक तसेच मान्यवरांचे  आभार मानले  आणि  शिवसेना हि पूर्वीपासून जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आली आहे आणि करत  राहणार अशी भावना श्री कवडे यांनी  व्यक्त केली. (प्रतिनिधी - केदारनाथ बारोळे)





 
Top