हजारो स्त्रियांचा लक्षणीय सहभाग
पुणे (पुणे सुपरफास्ट न्युज) -
'आजच्या
धावत्या युगात धर्म स्त्री रक्षण कार्याची गरज ओळखून सद्गुरू
शांतिगिरी महाराजांनी केलेलं प्रबळ स्त्री शक्ती यज्ञ कार्य प्रत्येक
स्त्रीला आपला आत्मविश्वास आणि सुसंस्कृती वाढविणारा अद्वितीय
सोहळातुका म्हणे पतिव्रता , तिची देवांवर श्रद्धा ' या संत उक्तिप्रमाने यध्न्य पुजेस
बसणाऱ्या प्रत्येक विवाहित माता भगिनिनि आपला पति हाच आपला गुरु आणि मार्गदर्शक
असतो आपल्या
सुखी जीवना करिता प्रत्यकाने जप यज्ञ ,करून मानसिक शांतता मिळवणे खुप
गरजेचे झाले असून स्वामी शांतिगिरिजी महाराजांनी फ़क्त
महिंलासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर 1008 कुंडात्मक यध्न्य आयोजित केला असून
यज्ञ पुजेस
अनन्य साधारण महत्त्व असून जेंव्हा पासून श्रुष्टि
बनली तेंव्हा पासून ही यज्ञ पूजा असून प्रत्येक मानव प्राण्यानी कमीत
बोलन्याचा प्रयत्न करावा आणि कोणतीही पूजा करताना मौन ठेवणे गरजेचे
असून मौनामुळे आत्मिक उन्नति सह आध्यात्मिक ताकद वाढते तर कोणतेही व्रत
करताना लोभ , मत्सर
, वाईट प्रवृत्तिना
थारा देवु नये असे प्रतिपादन औरंगाबाद वेरूळ येथे करवीर पीठाधीश्वर जगदगुरू
शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामीजिनी केले . निष्काम कर्मयोगी जगदगुरू
जनार्दन स्वामी ( मौनगिरिजि ) महाराज यांच्या 26 वे पुण्यस्मरणार्थ व 101 वि जन्मोत्सव् वर्ष निमित्ताने दी 15
ते 22 डिसेंबर या पर्वकालावर 1008 कुंडात्मक श्रीलक्ष्मी कुबेर
विश्वकर्मा महायाग व जपानुष्ठानाचे आयोजन श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरिजी महाराजांच्या
प्रमुख मार्गदर्शनाखाली व उपस्थितिमध्ये वेरूळ येथे करण्यात आले असून या महायागाचा शुभारंभ जगदगुरू
शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते झाला तर यावेळी श्रीमद्
जगदगुरू शंकराचार्य श्री स्वामी त्रिलोकी स्वरूपतीर्थ शारदा द्वारका पीठाधीश्वर
गुजरात , पंडित
मनोहर शर्मा हैद्राबाद , गगनगिरी महाराजांचे शिष्य कल्कि महाराज
, भागवतकार
अरुण महाराज भुसावळ , 108 महंत स्वामी जनेश्वरानंदजी महाराज
यांची प्रमुख उपस्थिति होती तर यावेळी जनार्दन स्वामींच्या
पालखीची वेरूळ गावामधुन भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या वेळी या
मिरवणुकी मध्ये अश्वांचे नृत्य , कळस धारी महिला , गुरुकुल विद्यार्थ्यांचे लेझीम
सादरिकरण उपस्थित सर्वांचे मने जिंकत होते तर बुधवारी
ह.भ.प.भास्करगिरीजी महाराज देवगढ़ संस्थान , श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी गिरिधरगिरिजी
महाराज कृष्ण निवास हरिद्वार , परम् आदर्श श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वरूपानंदजी महाराज -
सिहौर गुजरात हे आपल्या वाणीने भाविकाना मंत्रमुग्ध
करणार आहेत
पहिल्याच दिवशी महिलांची मोठी उपस्थिति
पहिल्यांदाच महिला सशक्तिकरण व सबलीकरण निमित्ताने 1008 कुंडात्मक महायाग पुजेकरिता फ़क्त महिलांना पुजेस बसण्याची संधि स्वामी शांतिगिरिजी महाराजांनी दिली असून या 1008 कुंडावर आठ दिवसामध्ये 27189 इतक्या महिलांना पुजेस बसण्याची संधि देण्यात येणार असून पहिल्याच दिवशी या पुजेस मोठा प्रतिसाद देत चार हजाराहुन आधिक महिलांनी सहभाग नोंदवित यज्ञ पूजा केली ( विजयकुमार हरिश्चंद्रे )
पहिल्याच दिवशी महिलांची मोठी उपस्थिति
पहिल्यांदाच महिला सशक्तिकरण व सबलीकरण निमित्ताने 1008 कुंडात्मक महायाग पुजेकरिता फ़क्त महिलांना पुजेस बसण्याची संधि स्वामी शांतिगिरिजी महाराजांनी दिली असून या 1008 कुंडावर आठ दिवसामध्ये 27189 इतक्या महिलांना पुजेस बसण्याची संधि देण्यात येणार असून पहिल्याच दिवशी या पुजेस मोठा प्रतिसाद देत चार हजाराहुन आधिक महिलांनी सहभाग नोंदवित यज्ञ पूजा केली ( विजयकुमार हरिश्चंद्रे )
