नवी दिल्ली - केंद्रातील एनडीए मत्रिमंडळाच्या विस्ताराच्या नवनव्या तारखा येत असून, त्या दरवेळी पुढे जात जात आता या महिनाअखेर किंवा फेब्रुवारीत, अशा नव्या मुहूर्ताची वदंता आहे. प्रत्यक्षात 282 व युती धरून लोकसभेत किमान सव्वातीनशे खासदारांचे दणदणीत बळ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या दृष्टीने "सक्षमअसलेले मंत्रीच मिळतच नसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे बिहार निवडणुकीनंतर घसरलेली मोदी मंत्रिमंडळाची प्रतिमा सुधारण्यासाठी संघानेही मंत्रिमंडळ विस्ताराचा आग्रह धरला आहे.
सरकारची अग्निपरीक्षा पाहणाऱ्या राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीपासूनच मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. सध्याच्या 66 मंत्र्यांतील 15 वकील, 10 अर्थतज्ज्ञ, 2 आयआयटीवाले, 4 डॉक्‍टर, 2 लेखापरीक्षक असे मंत्री व तब्बल सव्वातीनशे खासदारांपैकी एकही मोदींच्या नजरेत "सक्षमकसे नाहीत, याबद्दलही आश्‍चर्य व्यक्त होते. मुळात मोदींचे मंत्रिमंडळ हे राज्यसभा मंत्रिमंडळ असल्याची कुजबूज आधीपासूनच सुरू आहे.


 
Top