पुरंदर (पुणे सुपरफास्ट न्युज) -
महाराष्ट्रातील शक्तीपंथीयाचे एकमेव शक्तीपीठ म्हणुन ओळख असणार्या भुलेश्वर डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी शाक्तपंथीय श्री ओम शक्ती बाबा यांचा आश्रम आहे.या आश्रम परिसरात दत्त मंदिर , कालीका माता मंदिर, शक्ती बाबांचे समाधी मंदिर अशी मंदिरे आहेत. याठिकाणी वर्षभरात विविध उत्सन साजरे होतात .यामध्ये दत्त जयंती उत्सव विशेष मानला जातो.याचे आयोजन माळशिरस ,आंबळे,यवत परिसरातील बाबांचे शिष्य व भक्त परिवाराच्या वतीने केले जाते.
सकाळी लवकर श्री दत्तात्रेयांच्या मुर्तीस अभिषेक करुन .दुपारी १२ वाजता महाआरती करुन नैवेद्य दाखवुन महाप्रसादाचे वाटप करणयात आले.माळशिरस राजुरी पाटिलवस्ती येथे प्राणप्रतिष्ठा केलेल्या दत्तमंदिरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ७ वा. दत्तमुर्तीस पंचामृताने अभिषेक करुन महाआरती झाली व त्यानंतर हरिपाठ व दत्तजन्मानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.व रात्री ८ ते ११ यावेळेत भुलेश्वर दिंडीचे चालक ह.भ.प. लक्ष्मण महाराज यादव यांच्या सुश्राव्य किर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला.मामाची वाडी येथे ह. भ. प. निरंजन महाराज व दादासाहेब मेमाणे यांच्या कडे दत्तजयंती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. (प्रतिनिधी -विनय गुरव)