जेजुरी (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्री यांच्या संयुक्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आणि कै. कपिल मनोहर भापकर यांच्या स्मरणार्थ शिवराष्ट्र , पुरंदर यांच्या वतीने ७ जानेवारीला जेजुरी येथे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती व्याख्याते निलेश जगताप यांनी दिली.
स्पर्धेचे यंदा 4 थे वर्ष असून राज्यातील नामांकित स्पर्धा म्हणून ह्या स्पर्धेचा उल्लेख केला जातो, राज्यभरातून विविध वक्ते या स्पर्धेत सहभागी होत असतात ,महाविद्यालयीन गटात होणार्या या स्पर्धेत राज्यातील कोणत्याही कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतील .
स्पर्धेतील विषय पुढील प्रमाणे असून सहभागी होणार्या स्पर्धकांना या पैकी कोणत्याही एका विषयवार ७ मिनिटे बोलावे लागणार आहे , १) "दाभोळकर ते कलबुर्गी व्हाया पानसरे" ,२) "सहीष्णूतेच्या देशात असहीष्णूतेचे राजकारण" ,३) देशाने अनुभवलेले "कलाम" , ४)"जागतिक दहशदवाद आणि भारत" ,५)"लोकशाहीचा चौथा स्तंभ ढासळतोय का?" ,६) "ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस"
स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ७००० रुपये आणि स्मृतीचिन्ह , द्वितीय क्रमांक ५००० रुपये आणि स्मृतीचिन्ह , तृतीय क्रमांक २००० रुपये आणि स्मृतीचिन्ह तसेच ५०० रुपयांची ५ उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत , पुरंदर तालुक्यातील पहिल्या 3 विजेत्यांना विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत ,चांगला वक्ता दहा हजारात एखादाच आढळतो , असे म्हंटले जाते . महाराष्ट्राने आजवर अनेक उत्तम ओजस्वी वक्ते दिले आहेत , एक काळ असा होता की , राजकारण असो की कला वा समाजजीवनाच्या प्रत्तेक क्षेत्रात अनेक उत्तम वक्ते सहज दिसून येत, मात्र काळाच्या ओघात वक्तृत्वाचीही देदीप्यमान परंपरा नाममात्र उरल्यासारखी झाली आहे , महाविद्यालयीन विध्यार्थाकरता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . प्रत्येक महाविद्यालयातून जास्तीत जास्त तीन स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होता येईल , स्पर्धा ७ जानेवारी २०१६ ला सकाळी ९ वाजता जेधे सभागृह , पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यामंदिर जेजुरी , ता.पुरंदर येथे होणार आहे , स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी विक्रमराजे शिंदे ८१४९४४९५३७ , राहुल थोपटे ९५५२१०३४४४ आणि अभिषेक पवार ८८८८९९०२०५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे .