माळशिरस (पुणे सुपरफास्ट न्यूज) -
महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या भुलेश्वर मंदिरात आज वेरुळ  औरंगाबाद येथील जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री शांतीगिरी महाराजांनी श्री भुलेश्वर देवांची पाद्य पूजा करुण दर्शन घेतले या पुजेचे पौरहित्य विजय गुरव व श्रीकर पांडव यांनी केले मंदिरतुन बाहेर आल्यानंतर राजेंद्र गाडेकर मंदिरतील शिल्पकलेबद्दल माहिती दिली व सर्व पुजारी मंडळ यांचे वतीने  विनय गुरव यांनी सपत्नीक शांतीगिरी महाराजांचा पुणेरी पगडी व महावस्त्र देवून सन्मान केला महाराजांनी या   सन्मानाचा स्वीकार करुण महाराजांनी याच पुणेरी पगडी व महावस्त्राने विनय गुरव यांचा सन्मान केला यावेळी विष्णु महाराज, वेरुळ येथील पत्रकार वैभव किरगट, माळशिरस ग्रामपंचायत सदस्य निलेश गाडेकर, दादा गाडेकर व मोठ्या प्रमाणात भुलेश्वर भक्त व बाबाजी भक्त हजर होते.(पतीनिधी - विनय गुरव)

                         भुलेश्वर मंदिर परिसराची पाहणी करताना श्री शांतीगिरी महाराज व भाविक
 
Top