कोलकाता (पुणे सुपरफास्ट न्युज) - 
           गरीब, रुग्ण व अनाथांच्या सेवेत आयुष्य वेचणाऱ्या मदर टेरेसा यांना लवकरच संत घोषित केले जाणार आहे. पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या दुसऱ्या मेडिकल मिरॅकलला (चमत्कार) मान्यता दिली असून, यामुळे टेरेसा यांचा संत बनण्याचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे.
     मदर तेरेसा यांनी ८७ वर्षांच्या असताना १९९७ मध्ये कोलकात्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेरेसा यांनी गरिबांच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले. १९७९ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

      मिशनरीज आॅफ चॅरिटीच्या प्रवक्त्या सुनीता कुमार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. मदर तेरेसा यांना संताचा दर्जा मिळणार असून, आम्हाला याबाबत व्हॅटिकनकडून अधिकृतरीत्या कळविण्यात आले आहे. चर्चने दुसऱ्या चमत्कारालाही मान्यता दिली आहे, असे त्यांनी सांगितले. अनेक वर्षांपूर्वी कोलकाता येथे पहिला चमत्कारझाला होता. त्यानुसार मदर तेरेसा यांनी मोनिका बेसरा नामक बंगाली आदिवासी महिलेला तिच्या पोटातील ट्यूमरपासून मुक्ती मिळवून दिली होती. (वृत्तसंस्था)




 
Top