प्रतापगड (पुणे सुपरफास्ट न्युज) -
छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावर
अफझलखानाचा या दिवशी वध केला होता.
यानिमित्ताने दरवर्षी या दिवशी
शासनाच्या वतीने शिवप्रतापदिन साजरा करण्यात येतो. या उत्सवात
राज्यभरातील शिवप्रेमी जनताही सहभागी होते. राज्यभरातून हजारो शिवप्रेमी
सकाळपासून गडावर दाखल झाले होते. भल्या पहाटे सूर्याच्या साक्षीने मंगलमय
वातावरणात या सोहळ्याला सुरवात झाली.
‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष, ढोल-ताशा-हलगी- तुताऱ्या- लेझीम यांचा गजर, पोवाडय़ांची जोड, शिवकालीन ऐतिहासिक
खेळांची प्रात्यक्षिके आणि छत्रपती
शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर
हेलिकॉप्टरमधून केलेली पुष्पवृष्टी अशा
विविध उपक्रमांमधून किल्ले प्रतापगडावर
शुक्रवारी शिवप्रतापदिन उत्साहात
साजरा झाला. या वेळी महाराष्ट्राच्या
विविध भागातून शिवप्रेमी मोठय़ा
संख्येने उपस्थित होते. या उत्सवासाठी
गडावर बंदोबस्तही मोठय़ा प्रमाणात
ठेवण्यात आला होता.
