(पुणे सुपरफास्ट न्यूज)-
द.आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर मुरली विजय (१२) स्वस्तात बाद झाला आहे. धवनने मैदानात जम बसवण्यास सुरूवात केली असून पुजारा नुकताच मैदानात दाखल झाला आहे.
भारतीय संघाने कसोटी मालिका खिशात टाकली असली तरी हा शेटवचा सामनाही जिंकून मालिकेत ३-० अशा विजयाच्या निर्धाराने संघ मैदानात उतरला आहे. नागपूर कसोटीत  भारतीय फिरकीपटूंनी आपल्या फिरकी जादूने द.आफ्रिकेची दांडी गूल केली होती. नागपूरच्या कसोटी सामन्यानंतर खेळपट्टीचा विषय रंगतो आहे. त्यामुळे दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमची खेळपट्टी कोणते रंग दाखवते याकडे सर्वांचे लक्ष असणणार आहे. चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात अमित मिश्राऐवजी वेगवान गोलंदाज उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे.
  
 
Top