पुणे (पुणे सुपरफास्ट न्यूज)-
एकीकडे रुग्ण सेवा हि ईश्वर सेवा मानणारे डॉक्टर तर दुसरी कडे तिथेच पैसे
खाणारे पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातले भ्रष्ट
डॉक्टर.स्वस्तातील खात्रीशीर उपचारांमुळे गरीब माणसाचं आधार ठरलेल हे रुग्णालय आता
मात्र भ्रष्ट कारभाराचे कळस गाठते आहे.ठेकेदार आणि पुरवठादारांचे, नगरसेवक आणि
अधिकारीच आता भागीदार झाल्याने उंदराला मांजराची साक्ष अशी अवस्था आहे.त्यात रुग्णांचे
ईश्वर असणारे डॉक्टरच राजकारण करताना दिसता आहेत आणि त्यांचे खाजगी रुग्णालयांशी
असणारे संबंध याच ईश्वराना राक्षस बनवत आहेत.
हे रुग्णालय म्हणजे खाणाऱ्यांचे
घर झाले आहे, ७५० बेड ची व्यवस्था असलेल्या या रुग्णालयासाठी महापालिकेकडून भरपूर
सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे.कुठला हि विषय तातडीने मंजूर करायची
व्यवस्था प्रशासनाने केली आहे पण तरी देखील इथे रुग्ण मात्र त्रस्त आहेत.कुठल्याच
वरिष्ठ अधिकार्याचे लक्ष नाही कुणाचा वचक नाही प्रत्येक कर्मचारी इथे राजा आहे
अधिकाऱ्यांच्या भांडणात रुग्णालयाची अवस्था धोबी का कुत्ता न घाट का ना घर का अशी
झाली आहे. आयुक्त मात्र या वर अजिबात बोलत नाहीत इथे कर्मचारी नसल्याने अनेक अडचणी
उभा आहेत, पण यावर उपाययोजना होत नाहीत. १२ महिने फक्त कागदी घोडे मात्र नाचवले
जातात.तोड फोडीचा तर या रुग्णालयाने विक्रम गाठलाय,डॉक्टर सुद्धा रुग्णांना
स्वताच्या खाजगी रुग्णालयात अथवा इतर खाजगी रुग्णालयात (जिथे त्यांना ठरलेली % मिळते
तिथे )उपचार घायला भाग पडतात.रुग्णांना औषध सुद्धा ठरलेल्या दुकानातूनच घायला
लावली जातात.काही ठरविक कंपन्यांवर मेहरबानी करत महागडी औषध खरेदी केली जातात पण
ती मात्र रुग्णांन पर्यंत जात नाहीत. जाणीव पूर्वक औषधांचा तुटवडा निर्माण केला जातो
आणि आणि खाजगी दुकानदारांची आणि ठेकेदारांची व्यवस्था केले जाते.खल पासून वर पर्यंत
सगळाच घोळ पण लक्ष कोणाच नाही. (प्रतिनिधी:ज्ञानेश
भुकेले)