जेजुरी ( पुणे सुपरफास्ट न्युज )  -
श्री संत गाडगे महाराज यांच्या विचारणे प्रेरित होऊन राज्यातील तळागाळातील समाजावर प्रबोधनात्मक संस्कार करणारे , व्यसनमुक्ती , पशुहत्या , अनिष्ट रूढी  परंपरा मुक्त करणारे जेष्ठ प्रवचनकार ,प्रबोधनकार , राष्ट्रीय संत काशिनाथ महाराज वयाचे शतक पूर्ण होत असतंच तीर्थक्षेत्र जेजुरी येथील त्यांनी निर्माण केलेल्या विठ्ठल मंदिरात मंगळवारी निधन झाले .त्यांच्या या निधन वार्ताने  वारकरी संप्रदायात हळ हळ व्यक्त केली जात आहे .
     कोल्हाटी समाजाची स्थिती , अंधश्रद्धा ,मुलीच्या पायात चाळ बंधने , लग्न होऊन कुंकू न लावणे अशा अनिष्ट रूढी परंपरातून कोल्हाटी समाजाची मुक्ती करण्याचे महत्वपूर्ण कार्य करताना , श्रीसंत गाडगेमहाराज यांच्या स्वच्छता मोहिमेच्या प्रत्यक्ष हातात झाडू घेऊन राज्यभर कृतीशील प्रचार केला , स्वतः शिक्षण घेऊन रामायण , महाभारत , मल्हारी मार्तंड सारखे ग्रंथ वाचून समाजालाही शिक्षित करण्याचा प्रयत्न केला . अनेक व्यसनाधीन तरुणांना भक्तीमार्गाला लावणे , लहान मुलांकरता विद्यास्राम निर्माण करून त्यांच्यावर संस्कार करण्याचे महान कार्य त्यांनी केले , अंधस्रध्येच्या काळोख्यातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे कार्य त्यांनी केले होते याब्बदल त्यांना अखिल भारतीय कोल्हाटी समाजाच्या वतीने "राष्ट्रीय संत" म्हणून त्यांना गौरवण्यात आले , तसेच वारकरी संप्रदायातील मानाचा संत सोपानदेव भक्ती पुरस्कार , तसेच कराड वारकरी साम्प्रदाय्च्या वतीने जीवनगौरव , मार्तंड देव संस्थांच्या वतीने समाजप्रबोधनकार पुरस्कार बहाल करण्यात आले होते ,त्यांच्या दुखद निधनाने धर्म ,अर्थ  आणि शास्त्र अशा नटलेल्या महाराष्ट्रातील संत भूमीत आजच्या आधुनिक युगातील गाडगेमहाराज हरपला गेला असल्याचे दुखः जगदगुरु श्री.श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी  .शांतिगिरी महाराज यांनी व्यक्त केले .त्यांच्या निधनाबद्दल जयाद्री मित्र परिवार , श्री.मार्तंड देव संस्थान , शिवमल्हार जनसेवा प्रतिष्ठान ,मल्हारराजे प्रतिष्ठान , श्रीसंत सोपानकाका वारकरी संप्रदाय मंडळ , व्यसनमुक्ती युवा संघ आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली . ( प्रतिनिधी - विजयकुमार हरीचांद्रे )

 
Top