पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - 'एकच ध्यास युवकांचा आर्थिक विकास' संभाजी ब्रिगेड मार्फत सुरू
असलेल्या या अभिनव उपक्रमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर चालना देण्यासाठी
संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविणदादा गायकवाड यांचे प्रयत्नचालूआहेत , दुबई
आणि तत्सम आखाती देशात आपल्या युवकांना बर्याच व्यवसायिक व नोकरी विषयक
संधी आहेत.
देशाबाहेर जाऊन नवनवीन उद्योग
व्यवसायात झेप घेण्यासाठी संघटनेमार्फत प्रयत्न चालू आहेत. त्या अंतर्गत 18
नोव्हेंबर 2015 रोजी दुबई येथे 6 दिवसीय दुसरी आंतरराष्ट्रीय बिझनेस
काॅन्फरन्स चे आयोजन करण्यात आले होते , दुबईतील उच्चभ्रू पंचतारांकित हॉटेल मध्ये झालेल्या या सेमिनार मध्ये एकुणच महाराष्ट्रातील 40 युवकांचा सहभागघेतलाहोता ,या बिझनेस टूरचे आयोजन प्रवीणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अजयसिंह सावंत यांनी केले होते