पुरंदर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात मौजे वाघापूर या ठिकाणी ९ वर्षापूर्वी यशवंत एजुकेशन व रिसर्च अक्याडमि च्या वतीने ग्रामीण भागात सुद्धा चांगल्या प्रतीचे व इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे या हेतूने शारदा इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. या वर्षी सहामाही परीक्षा संपल्या नंतर दिवाळीची सुट्टी लागण्या पूर्वी या शाळेत मुख्याद्यापिका अश्विनी इंदलकर व उपमुख्याद्यापिका  गायत्री वनारसे यांनी एक अनोखा उपक्रम घेण्याचे ठरविले या मध्ये इयत्ता ५ वी ६ वी व ७वी च्या विध्यार्थ्यांनी एकत्र येवून  शाळेच्या प्रांगणात दिवाळीचा बाजार भरविणे असा उपक्रम होता यामुळे  विध्यार्थ्याना व्यवहार ज्ञान व एक प्रकारचा वेगळा आनंद मिळेल हे उदिष्ट समोर ठेवून हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला होता या वेळी विध्यार्थ्यांनी इडली चटणी,ओली भेळ,वडा पाव,आलू पराठे,सौदर्य  प्रसाधने,खेळणी,लाडू,चिवडा,चकली
,शीत पेय ,फळ विक्री, व दिवाळी काळात केल्या जाणा-या किल्यावर ठेवण्साठी मातीचे सैनिकअशी विविध दुकाने यावेळी शाळेच्या प्रांगणात थाटली होती. या उपक्रमास सर्व विध्यार्थ्यांनी पालकांनी व परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवून शाळा व विध्यार्थ्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी -विनय गुरव ) 
 
Top