प्रेम ज्यांनी केलं नाही त्यांच्यासाठीं .  . . . .
. . . प्रेम हे असचं असतं
प्रेम हे ठरवून होत नसते ते आपोआप होते दोन मनांचे हे विश्वास ाचे नाते आहे ज्यानी कधिच कुणावर प्रेमच केल नाही तो माणूसच नव्हे त्याला जगण्याचा ही अधिकार नाही या लोकानी सतीश टोणगे यानी लिहीलेले .  . प्रेम हे असचं असतं हे पुस्तक वाचण्या सारखे आहे म्हणूनच ह्या पूस्तकानी तरूणाई वर प्रभाव टाकला आहें
प्रेमात अडीच्च अक्षरांनी अशी जादू होते व संपूर्ण जीवन प्रेममय होऊन जाते, मन:चक्षू मुक्तपणे तिझ्यासवे विहार करु लागतात, गुलाबी स्वप्नांनी जीवनास उर्जितअवस्था प्राप्त होते व स्वप्नमयी दुनियेत तलीन होऊन फक्त ती अन तिझ्या आठवणींचे हिंदोळे हृदयाच्या झुल्यावर प्रेमाचे झोके घेताना, ती लाजवंती, ती कोमलांगी, ती तिझं हसणं, तिझं लाजणं यासारख्या अनेक छटातून भावनींची गर्दी कधी चेहर्यावर स्मितहास्य आणते व चेहरा उमलेल्या फुलासारखा प्रफुल्लतित होतो, तर विरहाच्या असहाय्य भावनांनी डोळयातील कडा तिझ्या आठवणी अश्रूरुपात अापसुकपणे होतात,
विविधांगी भावाविष्कारातून फक्त प्रेमाची उधळण करुन प्रेम हि तरल भावना जोपासून आपल्या प्रेमासाठी आपलं जीवन समर्पित करुन आनंदाची आेंजळ सदैव तिझ्यासाठी जीवपाड जपून ठेवावी यासाठी प्रेमिकांचा अविरतपणे प्रयत्न सुरु असतो, प्रेमसागरात आपल्या ईच्छित स्थळा पर्यन्ताचा गुलाबी प्रवास यशस्वी, स्वप्न व वास्तवाची मोट बांधून आपल्या प्रेमाची किनाऱ्याला पोहचते तेंव्हा त्यांच्या आनंदास पारावार उरत नाही, अडथळाच्या लाटेवर खात काहींची दिशा हरवते व स्वप्नेही! तर काहींची स्वप्ने फक्त स्वप्नातच राहतात अन प्रेमाची नौका जीवनाची वाट हरवते व गुलाबी स्वप्नांना मिळतो तो कायमचा पूर्णविराम! तर काहीजण उध्वस्त झालेल्या भग्न स्वप्नांचे अवशेष आपल्या उराशी कवटाळून बसतात मग जीवनात उरते ती फक्त स्मशान शांतता!
खरं तर प्रेम हि अतिशय निरमळ व सात्विक भावना आहे, कापुरा सारखी निरामय समर्पितपणाची उदात्त भावना प्रेम असली तर खऱ्या अर्थाने  प्रेमाचा पुष्प सदैव प्रफुल्लित राहू शकेल, प्रेमाच्या मयूरपंखी आठवणींचा अमूल्य ठेवा आपल्या सदाबहार लेखणीतून साकारणारे माझे मित्र लेखक सतिश टोणगे यांनी प्रेमाचे भावविश्व हळूवार पणे उलगडून "प्रेम हे असंच असतं"...! हा ग्रंथ मनात ॠणझूण घालणारा आहे आनंदापासून विरहापर्यन्त प्रेमाचे विविध कांगोरे ग्रंथातील भावविभोर उलडताना त्या घटना आपल्या डोळासमोर जिवंत उभ्या राहतात हे लेखक सतिश टोणगे यांचे लेखणीचे सामर्थ्य आहे! "प्रेम हे असंच असतं "...!हा ग्रंथ मराठी वाचकांच्या हृदयावर अनंतकाळ अधिराज्य करेल असा विश्वास वाटतो, लेखक सतिश टोणगे यांच्या साहित्य प्रवास माझ्या अनंत शुभेच्छा!

पुस्तक परिक्षण . .  . .
शरद गोरे
राष्ट्रीय कार्याध्यक्ष
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे
 
Top