पुरंदर तालुक्यातील
शिवसेनेचे जलसंपदा राज्यमंत्री विजय
शिवतारे यांच्या गावातील शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते मयूर जाधव यांनी शिवसेनेला
रामराम ठोकत कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला , ये वेळी इंदापूर बाजार समितीचे
युवा सभापती मयूरसिंह पाटील, युवा नेते संजय जगताप , नीरा बाजार समितीचे नंदुकाका
जगताप , जिल्हा परिषद सदस्या मनीषाताई काकडे ,पंचायत समिती सदस्य दत्ता झुरांगे ,
दिलीप धुमाळ , स्वप्नील सावंत , रमेश पवार, गणेश मेमाणे ,भरत धुमाळ , भारती
गायकवाड , प्रदीप पोमण यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी या कार्यक्रमास
उपस्थित होते .
विश्वजित कदम यांनी यावेळी सांगितले की ज्यांना
शेतीचा बांध कळत नाही अशांना सत्ताधारी पक्षांनी मंत्रिपदे दिली आहेत , त्यामधील
पुरंदरमध्ये एक आले असून त्यांना आमचीच जुनी कामे दाखवून समाधान मानावे लागत असून
लोकसहभागातून केलेली कामेच आम्ही विकासकामे केली असल्याचा थापांचा डोंगरच रचण्याचा
कार्यक्रम गेली सहा वर्षे चालू आहे , गुंजावानीच्या पाण्याच्या नावाखाली
गुंजावानिचे पाणी दुषित होण्याची वेळ आली असताना मंत्री महोदय हे जाईल तेथे संजय
जगताप यांच्यावर टीका करण्यात वेळ वाया घालवत असून खर तर मंत्री महोदयांना पद
भोगण्यापेक्षाही जगतापांचा मोठा धसका लागला आहे , विधानसभेवेळी घड्याळाचे काटे
मनमानीप्रमाणे ताणले गेले पुढील काळात विधानसभेपूर्वी जि निवडणूक येईल त्यावेळी
पाटील,थोपटे,जगताप,कदम हेच त्याचे भविष्य ठरवतील
त्यासाठी काट्यांचा ताण कसा वाढवायचा याचाही विचार होईल असा चिमटा राष्ट्रवादी
पक्षालाही त्यांनी लगावला , त्यामुळे पुरंदरच्या जनतेला उल्लू कोण बनवत हे नक्कीच
कळेल .
कार्यकर्त्यांनी
काढले शिवतारेंचे त्यांच्याच गावात वाभाडे – आम्ही शिवसेना पक्ष सोडण्याचे कारण
असे आहे की खोत बोल pan रेटून बोल असा नाराच शिवसेनेणे लावला असून केवळ हुजरेगिरी
करण्याचे काम चालू आहे , स्वाभिमानाचा केवळ कांगावा असून स्वभिमानात एजंट व
स्वार्थी लोकांची टोळी तयार झाली आहे, जनतेच्या भावनाशी खेळून विकास न करता केवळ
थापांचा बाजार सहन न झाल्याने आम्ही शिवसेना पक्ष सोडला असल्याचे मत यावेळी व्यक्त
करण्यात आले
जलराज्यमंत्री विजय
शिवतारे यांच्या एकहाती तंबूला गावातूनच भगदाड – पुरंदर तालुक्याचे आमदार व
राज्याचे जलसंपदा राज्या मंत्री विजय शिवतारे यांच्याच गावातून व परिसरातून विजय
शिवतारेना घरचा आहेर देत कॉंग्रेसमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याने ,
भविष्यात कॉंग्रेस पक्ष हा वाघाचे तोंडात पंजा घालून दात मोजणार हे नक्की ? ( प्रतिनिधी –
प्रकाश पवार )
