पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - 'एकच ध्यास युवकांचा आर्थिक विकास' संभाजी ब्रिगेड मार्फत सुरू असलेल्या या अभिनव उपक्रमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर चालना देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे नेते  प्रविणदादा गायकवाड यांचे प्रयत्नचालूआहेत , दुबई आणि तत्सम आखाती देशात आपल्या युवकांना बर्‍याच व्यवसायिक व नोकरी विषयक संधी आहेत. देशाबाहेर जाऊन नवनवीन उद्योग व्यवसायात झेप घेण्यासाठी संघटनेमार्फत प्रयत्न चालू आहेत. येत्या 18 नोव्हेंबर 2015 रोजी दुबई येथे 6 दिवसीय दुसरी आंतरराष्ट्रीय बिझनेस काॅन्फरन्स होत आहे.दुबईतील उच्चभ्रू पंचतारांकित हॉटेल मध्ये होत असलेल्या या सेमिनार मध्ये एकुणच महाराष्ट्रातील 40 युवकांचा सहभाग होत आहे.
तेथील काही तज्ञांसोबतच संभाजी ब्रिगेड चे नेते प्रविणदादा गायकवाड व महाराष्ट्रातील उत्कृष्ट व्यवसाय सल्लागार अनिषजी होले यांचेही मोलाचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे ,कुणाला यात सामील व्हायच असेल तर त्यांनी 
अजयसिंह सावंत खास यांच्याशी ९८८१२५४३४५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

 
Top