जेजुरी ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - जेजुरीच्या सर्वभौमितिक क्षेत्रात अठरा पगड जातीधर्माचे ऐक्य खंडोबा देवाच्या वास्तवाने आजही टिकवून मानवतेच्या  एकता व सामाजिक जीवनशैलीचा साक्षात्कार घडवणाऱ्या जेजुरी नगरीत जातींनी मुस्लीम पण मातृभूमीच्या प्रेमाने झाप्त्लेल्या खंडोबा भक्त अयुब दिलावर या खान बंधूनी आजही खंडोबा देवतेचा इतिहास व सेवा अखंड जपल्याचा पुरावा १९४२ सालच्या उपलब्ध छायाचित्रा वरून मिळतो .                         अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि भारतीय लोककला संस्कृतीचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडाच्या पायथ्याशी निवासी असलेलेखंडोबा देवाच्या अश्वाचे मानकरी आयुबभाई खान व दिलावरभाई खान यांचेकडे स्वातंत्र्यपूर्व काळातील जेजुरीचा इतिहास उलगडणारी अनेक दुर्मिळ छायाचित्र असून त्यांच्या संग्रहातून सन १९४३ सालातील
पुण्यातील खंडोबा उत्सवमूर्तींचा भव्य-दिव्य मिरवणुकीचा दुर्मिळ फोटो आढळून आला आहे.या छायाचित्रात त्यांचे वडील व मानकरी पै. बाबुलाल रसूल खान हे सहभागी झालेले दिसत असून त्यांना छायाचित्रे काढून संग्रही ठेवण्याची आवड असल्याचे समजते.सन.१९९० साली निधन झालेले जर्मन शास्त्रज्ञ गुंथर सोनथायमर (गुंथर दादा )यांचाही खान परिवाराशी विशेष स्नेह होता
गुंथरदादांनी चक्क मराठीतून लिहिलेली पत्रे आणि काढलेली छायाचित्रे खानबंधूंच्या संग्रही आहेत.शिवाय सन १९५५-५६ चे दरम्यान टिपलेले (दिलीपकुमार -वैजयंतीमाला यांचे नयादौर चित्रपटा दरम्यान )छायाचित्र दिसून येते.३० ते ४० वर्षापूर्वीचा पालखी सोहळा,५० वर्षापूर्वी जेजुरीवासियांनी रंगविलेले बेबंदशाही या नाट्यकलेतील पात्रे,६० वर्षापूर्वीची जामामस्जिद,अशी एक ना अनेक छायाचित्रे त्यांचेकडे पहावयास मिळतात.जेजुरी परिसरात सर्पमित्र -निसर्गमित्र आणि वनऔषधींचे सखोल ज्ञान अवगत असलेल्या खान बंधूंना जेजुरीतील खंडेरायाच्या उत्सवमुर्तींची पुण्यात
भव्य मिरवणूक कशी ?हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलेली हकीकत अशी,सन १९४२ च्या क्रान्तिपर्वाच्या स्वातंत्र्यलढ्याचे वेळी गडावरील खंडोबा मंदिरातील उत्सवमूर्ती आणि दागिने यांची चोरी झाली होती.हा दरोडा तत्कालीन क्रांतीकारकानी घातला होता.पुढे १९४३ साली इंग्रज सरकारला या मूर्ती कोल्हापूर येथे सापडल्या त्यानंतर त्या मूर्ती पुण्यात आणल्या गेल्या
आताच्या खडकमाळआळीतील तहसीलकचेरीत विशेष न्यायालयाची स्थापना होवून सुनावणी नंतर त्या उत्सव मूर्ती जेजुरीतील खांदेकरी-मानकरी ग्रामस्थ आणि पुजारी सेवेकरी यांचे ताब्यात देण्यात आल्या ,ज्या दिवशी उत्सव मूर्ती ताब्यात मिळाल्या त्या वेळी जेजुरी वासियांनी अब्दागिरी-छत्रचामरे,पालखी पुण्यात नेवून घडशी समाजबांधवांच्या सनई-चौघड्याच्या मंगलमय स्वरात    वाजत -गाजत   पुण्यातील पेठेमधून भव्य मिरवणूक काढली होती अर्थात या मिरवणुकीमध्ये जेजुरीतील तत्कालीन परगण्या पाटील कै.राजाराम शिंदे,स्वातंत्र्य सैनिक बाबुराव भापकर,बाबुराव
रत्नपारखी,बाबुलाल खान,जेजुरीतील पुजारी -सेवेकरी मानकरी व अठरापगड जातीधर्मातील समाजबांधव सहभागी झालेला होता या मिरवणुकीत पुण्यातील दत्तमंदिरानजीक पेठेमध्ये टिपलेले छायाचित्र खान बंधूनी आठवणींचा अनमोल ठेवा म्हणून जतन करून ठेवले आहे (प्रतिनिधी -विजयकुमार हरीचंद्रे )



 
Top