दिपोत्सवास पुरातन खात्याचा विरोध , भाविकांमध्ये नाराजीचा सुर

पुरंदर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणुन ओळख असणा-या पुणे जिल्ह्यातील  भुलेश्वर मंदिरात वर्षभरात अनेक उत्सव होतात . या पैकिच एक महत्वाचा उत्सव म्हणजे त्रिपुरा पौर्णिमा .
                 तारकासुराच्या तीन पुत्रांसाठी मयासुराने त्यांच्यासाठी तीन पुरे बनविली व त्यांना देताना बजाविले की देवांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना त्रास देऊ नका. पण शेवटी असुर ते असुरच त्यांची शेपूट वाकडी ती वाकडीच म्हणून शेवटी त्यांची कायमची खोड मोडण्यासाठी श्रीशंकराने त्यांचा नाश करून या त्रिपुरांची होळी केली. तो दिवस दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा अशा प्रकारे चांगल्या वृत्तीने वाईट वृत्तीवर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी त्रिपुरी दीपोत्सवाची प्रथा सुरु झाली.
        कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावतात. महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, देवांनींच मंदिरे प्रकाशमय केली आहेत. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला “मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी” असे म्हणतात.
          या वेळी माळशिरस , यवत, कासुर्डी, उरुळी कांचन , ताम्हणवाडी पंचक्रोशीतील शिव भक्तांनी भुलेश्वर मंदिरात दिवे लावण्यासाठी गर्दी केली होती.
यावेळी लावलेल्या हजारो दिव्यांनी भुलेश्वर मंदिर उजळुन निघाले. गेल्या वर्षी मंदिरात लावले होते. त्यावेळी
      " मातीचे दिवे लावल्यानंतर त्यातील तेल खाली पाझरल्यामुळे दगडावर तेलकट ओघळ येतात व तसे  होवु नये म्हणुन प्रत्येक दिव्याखाली जाड पुठ्ठा ठेवुन त्यावर दिवे लावण्याची भाविकांनी खबरदारी  घेतली  होती ."
    परंतु यावर्षी दिपोत्सवाच्या धार्मिक विधीस मज्जाव करण्याच्या पुरातत्व विभागाच्या अडमुठ भुमिकेमुळे भाविकांमध्ये नाराजीचा सुर दिसत होता. ( प्रतिनिधी - अक्षय चाचर )


 
Top