जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -  पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा प्रदीप दादा कंद यांच्या समोर काल दि.२५ अमित भाऊ बेनके व शंकर जाधव व इतर लोकांनी खरे काय घडले याचे व्हिडीओ क्लीप,फोटो असे अनेक पुरावे सादर केले ,हे पाहून दादा ही थक्क झाले प्रदीप दादा यांनी आज सगळ्या प्रकरणाची चौकशी करून नारायणगाव पोलीस स्टेशनला कलम 395 नुसार सरपंच सौ जयश्री मेहेत्रे व ग्रामसेवक राजेंद्र खराडे यांच्यावर दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले या घटने मागील मुख्य सूत्रधार एक स्वयंघोषित नेता आहे यानेच 60  गाळे धारकाकडून प्रत्येकी 2 लाख रुपये मागितले आहेत, नाही दिले तर गाळे पाडून टाकील किंवा ताब्यात घेईल अशी धमकी दिली आहे,  या गाळे धारकांपैकी काही विधवा महिला, गरिब दुकानदार गाळे धारकांनी आपले दागिने गहाण ठेऊन एक एक लाख रुपये शाबीर पतसंस्थे मध्यें भरले आहेत,
गाळे धारकांनी उर्वरीत एक एक लाख रुपये न भरण्याचा निर्णय घेतला असे कळल्या मुळेच उर्वरीत रक्कम वसूल करण्यासाठी  नेत्याने शंकर जाधव यांचा बळी दिला, मुख्य सूत्रधारावर म्हणजेच नेत्यावर वर खंडणीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गाळे धारकांकडून  होत आहे.
 
Top