पिंपरी - चिंचवड ( पुणे सुपरफास्ट न्युज -
माहेराहुन पैसे घेऊन यावेत यासाठी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनोद साने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद साने हे सध्या जलद प्रतिसाद पथकामध्ये (QRT) पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. काही दिवसांपासून साने यांनी त्यांच्या पत्नीकडे माहेराहून 5 लाख रूपये घेऊन येण्यासाठी तकादा लावला होता. या कारणावरुन साने पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ करत असत. काल साने याने पत्नीला मारहाण करत तिचा गळा आवळून तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी साने याच्या पत्नीने त्याच्याविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 
Top