"सनई मल्हार" उत्सवात रंगली "दिवाळी सांज"
जेजुरी ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - जेजुरी ही कलावंतांची नगरी , आजवर महाराष्ट्राला अनेक कलावंत देण्याचे काम याच जेजुरीनगरीने केलेले आहे , आणि म्हणूनच जेजुरीतील कलाकार, कलावंताच्या कलेला वाव देण्यासाठी घडशी समाज युवा प्रतिष्ठान जेजुरी यांच्यावतीने "सनई मल्हार" उत्सवाअंतर्गत चित्रकला , रांगोळी आणि स्थानिक कलावंतांच्या केलेला प्रोत्साहन देण्यासाठी "दिवाळी सांज" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध तबलावादक अमोल बेलसरे , प्रसिद्ध छायाचित्रकार , निवेदक विजयकुमार हरिचंद्रे उपस्थित होते , या वेळी जेजुरी परिसरातील शेकडो विध्यार्थ्यांनी चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतला होता, या स्पर्धेच्या माध्यमातून मुली वाचावा असा सुद्धा संदेश या वेळी चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकानी दिला ,दत्तात्रय मोरे आणि कबीर मोरे यांच्या सुरेल सनई वादनाने या कार्यक्रमाला सुरवात झाली , यावेळी गौरव मोरे यांनी तबला सोलोवादन करून वातावरणात जोश निर्माण केला ,सार्थक मोरे आणि विशाल मोरे यांच्या जुगलबंदीने या मैफिलीत रंग भरला ,तर प्रथमेश मोरे यांच्या सेकसोफोन वादन आणि विकास कदम, तुषार मोरे यांच्या गायनाने मैफिलीची सांगता झाली , या कार्यक्रमात बाल कलाकार सई मोरे हिच्या गायनाने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले होते ,एकीकडे ज्या काही महाराष्ट्रातील लोककला आहेत त्या लुप्त पावत असताना ,आपल्या काही परंपरा ज्या काही लोककला आहेत त्या जिवंत ठेवण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करू अशी आशा घडशी समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली . या कार्यक्रमाचे आयोजन घडशी समाज अध्यक्ष राजेंद्र मोरे , युवा अध्यक्ष सचिन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घनश्याम मोरे, सागर मोरे , निलेश मोरे ,प्रसाद मोरे यांनी केले , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार मोरे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन मोरे यांनी व्यक्त केले. ( प्रतिनिधी - अक्षय चाचर )