मुंबई ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार कपिल पाटील
यांच्याशी फोनवरुन बोलताना, शिक्षणमंत्र्यांनी तयार वेत्र्लेला नवीन शिक्षण
धोरणाचा मसुदा पूर्णपणे scrape करत असल्याचं ठाम शब्दात सांगितलं. हा
मसुदा पुर्णपणे चुकीचा आहे. कपिलजी मी पुर्णपणे तो रद्द करतो आहे, असं
मुख्यमंत्री म्हणाले.
आमदार कपिल पाटील यांनी काल मुख्यमंत्र्यांना नवीन शिक्षण
धोरणाबाबत सविस्तर पत्र लिहलं होतं आणि हस्तक्षेप करण्याची मागणी
केली होती.
दलित, आदिवासी आणि विशेष गरजा असणारे वि़द्यार्थी (अंध, अपंग,
मंद, गतीमंद इ. शारीरिक आव्हाने असलेले) यांच्या सवलती रद्द करणं, सहा
तासांची शाळा आठ तासांची करणं, इंग्रजी व हिंदी भाष न शिकवणे इ. मुद्दयांवर
कपिल पाटील यांनी अत्यंत आव्रत्र्मकपणे हरकत घेतली होती.
मुख्यमंत्री म्हणाले, हे सगळं चुकीचं आहे. मी सगळा प्रस्तावच मागे घ्यायला सांगत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या संवेनशीलतेबद्दल कपिल पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
'मुख्यमंत्री महोय हस्तक्षेप करा, शिक्षणमंत्र्यांना आवरा'
असं काल कपिल पाटील यांनी ट्विट केलं होतं, ते पाहिल्यावर मुख्यमंत्र्यांनी
तातडीने त्याविषयाची दखल घेतली आणि स्वतः आज कपिल पाटीलांशी फोनवर बोलून
आपला निर्णय सांगितलं.
