पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -काश्मीर मधील कुपवाडा येथे वीर मरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक याचं पार्थिव आज दुपारी ४ च्या दरम्यान पुण्यात दाखल झाल.विमानतळ ते सातारा रोड वरील टोलनाक्या पर्यंत पुण्याच्या “किंग्स रॉयल रायडरस” नि कर्नल महाडिक यांना श्रदांजली म्हणून पार्थिवा सोबत ४० रायडरसनी सातारा रोड वरील टोलनाक्या पर्यंत प्रवास केला,पुण्याने एका शूरविराला दिलेली हि अनोखी मानवंदना होती.
    पुणे विमानतळा पासून ह्या बाईक प्रवासाला सुरवात झाली तिथून राष्ट्रीय युद्ध स्मारक घोरपुरी,पुणे कॅम्प ते सातारा रोडवरील टोलनाक्या पर्यंत या युवकांनी पार्थिवा सोबत प्रवास केला.एकीकडे बाईक वर बेधुंद पणे वावरणारी तरुणाई स्वयराचारी झालेली दिसत असताना या तरुणांनी अश्या प्रकारे श्र्दांजली देण हा एक नवीन आदर्श होता.या रायडरस पेकी एकाशी बोलत असता त्यानी सांगितल कि “आपल्या देशासाठी स्वताचे जीव पणाला लावणाऱ्या प्रत्येक सैनिकाला मानवंदना देण हे आपल कर्तव्य आहे,आणि आम्ही स्वताला भाग्यवान समजतो कि अश्या महान सैनिकाला आम्हाला मानवंदना देता आली”
  आज महाडिक याचं पार्थिव सातारा इथे रावना होईल आणि उद्या त्यांच्या पार्थिवा वरती अंतिमसंस्कार होतील.   
 ( प्रतिनिधी-ज्ञानेश भुकेले )
 
Top