मुंबई( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पहिल्या दिवशी रेल्वेचा पहिला डाव संपुष्टात आणणाऱ्या मुंबईला सामन्याच्यातिसऱ्या दिवशी फक्त एकच बळी मिळवता आला. मुंबईने फिरकीच्या जोरावर बरेचसामने जिंकले असले तरी त्यांचा मंगळवारचा मारा बोथट आणि दिशाहीन आणिनावीन्याचा लवलेश नसलेला होता. रेल्वेचा सलामीवीर सौरभ वाकस्करने मुंबईच्यागोलंदाजांना झगडायला लावले. कारण तोच या दिवसाचा नायक ठरला. त्याने जवळपाससंपूर्ण दिवस खेळून काढत नाबाद दीड शतक झळकावले आणि रेल्वेची गाडी रुळावरआणली. तिसऱ्या दिवसअखेर रेल्वेची १ बाद २८५ अशी स्थिती असून त्यांच्याकडे१७१ धावांची आघाडी आहे. त्यामुळे बुधवारी रेल्वेचा संघ कधी डाव घोषित करतोआणि मुंबई या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणार का, याची उत्सुकता साऱ्यांनाअसेल. वानखेडेची खेळपट्टी संथ होत चालली असून सामन्याच्या अखेरच्या दिवशीकर्ण शर्माच्या फिरकीवर साऱ्यांचीच नजर असेल.
दिवसाच्या दुसऱ्याच षटकात कर्ण शर्माने विशाल दाभोळकरचा बळी मिळवत मुंबईचापहिला डाव संपुष्टात आणला. पहिल्या डावातला त्याचा हा सातवा बळी होता. यावेळी मुंबईला आपल्या धावसंख्येत फक्त एका धावेची भर घालता आली आणिपदार्पणात शतक करण्याचे निखिल पाटीलचे (नाबाद ८३) स्वप्न भंग पावले.
मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. शार्दूल ठाकूरच्यापहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर आशीष सिंगचा सोपा झेल निखिल पाटीलनेस्लिपमध्ये सोडला, त्या वेळी तो शून्यावर होता. त्यानंतर त्याने ४४धावांची खेळी साकारत १०५ धावांची सलामी दिली. उपाहाराच्या काहीमिनिटांपूर्वी त्याला विशालने पायचीत पकडले. पण तोपर्यंत सौरभने एका बाजूनेखंबीरपणे आपले पाय रोवले होते. मुंबईच्या फिरकीपटूंनी त्याला बादकरण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसले नाही. त्यांच्या चेंडूचा टप्पाआणि दिशा बळी मिळवण्यासाठी पूरक नव्हती. दिवसाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्यासत्रात मुंबईवर एकही बळी न मिळवण्याची नामुष्की ओढवली. त्याचबरोबरक्षेत्ररक्षणामध्येही आक्रमकता दिसली नाही. याचाच फायदा सौरभने उचलला आणिव्ही. चेलुवाराजला आपल्या साथीला घेतले. या दोघांनी मुंबईची फिरकी गोलंदाजीमोक्याच्या क्षणी कशी निष्प्रभ करता येऊ शकते, याचा उत्तम वस्तुपाठ दिला.फलंदाजाला बाद करण्यासाठी चेंडूला अधिक उंची देण्याचा विचार मुंबईच्याएकाही फिरकीपटूने केला नाही, हेच दुर्दैव. सौरभने उपाहारानंतर मोसमातीलपहिले शतक लगावले. त्याच्या या खेळीमध्ये कुठलाही बडेजाव नव्हता. शांतपणेत्याने मुंबईच्या गोलंदाजांचा सामना केला. सौरभने खेळपट्टीवर जवळपास सहातास खेळपट्टीवर ठाण मांडला. त्याने २६० चेंडूंमध्ये १५ चौकार आणि २षटकारांच्या जोरावर नाबाद १६१ धावांची खेळी साकारली. सौरभला चेलुवाराजनेसुयोग्य साथ देत सहा चौकारांच्या जोरावर नाबाद ७० धावांची खेळी साकारली. यादोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १८० धावांची अभेद्य भागीदारी रचली.
 
Top