सातारा (पुणे सुपरफास्ट न्युज)- जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा
जिल्ह्यात लष्कराचे जवान व दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत कर्नल संतोष
महाडिक शहीद झाले असून आणखी चार जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. लष्कराचे
जवान व दहशतवाद्यांदरम्यान सोमवारी रात्री सुरू झालेली ही चकमक अद्यापही
सुरूच आहे. कूपवाडाच्या जंगलात सुमारे ५ ते ८ दहशतवादी लपले असून ४१व्या
राष्ट्रीय रायफल्सचे जवान त्यांचा शोध घेत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार
केल्याने ही चकमक सुरू झाली. त्यात कर्नल संतोष महाडिक व चार जवान गंभीर
जखमी झाले होते, आणि उपचारांदरम्यान कर्नल महाडिक यांचे निधन झाले. कर्नल
महाडिक हे मूळचे साता-याचे असल्याचे समजते. (प्रतिनिधी-निखिल जगताप)
