पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - आता पुण्यात गगनचुंबी इमारती दिसतील विकास नियंत्रण नियामवली मध्ये २४ मीटर पेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावर,म्हणजे जंगली महाराज रोड,पौड रस्ता,सोलापूर रस्ता,आता आकाशाला भिडणाऱ्या इमारतींनी सजलेले दिसतील. पण या सोबतच महत्वाची समस्या म्हणजे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी रस्ता रुंदीकरणा अंतर्गत पुण्यातील मुख्य पेठ भागातील रस्ता रुंदिकर्ण मध्ये बऱ्याच भूमिपुत्रांची पूर्णच जागा जाणार आहे त्यामुळे भूमिपुत्रच बेदखल होण्याची भीती आहे या सह डीपीतल्या ३०% रस्त्यांचे रुंदीकरण हि महापालिकेने कायम ठेवले आहे तर उर्वरित ७०% रस्त्यांचे रुंदीकरण न करता १९८७ प्रमाणे ठेवले जाणार आहे. या नंतर मात्र आता एकीकडे पुण्यात इमारतींच्या उंचीला बंधन नसल्या मुले गगनचुंबी इमारती दिसतील पण दुसरीकडे भूमिपुत्रांचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्ह आहेत. (प्रतिनिधी:ज्ञानेश भुकेले)
 
Top