नांदेड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरामध्ये जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानात
अनेक फटाका व्यापा-यांनी आपली दुकाने थाटली होती ,आज सायंकाळच्या सुमारास फटाक्यांच्या दुकानाला अचानक आग लागली या आगीत
फटाक्यांची 16 दुकाने जळून पूर्णपणे खाक झाली आहेत , दिवाळी आजपासून चालू झाल्याने सायंकाळच्या सुमारास फटाके
खरेदीसाठी मोठी गर्दी होती , अचानक आग लागल्याने सगळीकडे एकच धावपळ उडाली., या धावपळीत काही नागरिकांना किरकोळ दुखापत झाली मात्र या आगीत फटाका
व्यापा-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे , दुकाणासमोरिल 7 दुचाकी आणि एक
ऑटो जळून खाक झाला , आग लागल्यानंतर अग्निशमक दलाला घटना स्थळी पोहचायला उशीर झाल्याने
संतप्त झालेल्या नागरिकांनी अग्निशमक दलाची गाडी फोडली, दरम्यान सध्या आग
आटोक्यात आली आहे.
