अनुसूचित जाती 6,
अनुसूचित जमाती 3,
नागरीकांचा मागास प्रवर्ग 13 आणि
खुल्या प्रवर्गातील 28 नगरपरीषदा महिलांसाठी राखीव

 मुंबई ( पुणे सुपरफास्ट न्युज )  – शासनाने नव्याने स्थापन केलेल्या 100 नगरपरिषदा/ पंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग आणि महिलांसाठी राखीव प्रवर्गाची आरक्षण सोडत आज मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली. 
राज्यात पूर्वीच्या असलेल्या 239 व नव्याने स्थापन झालेल्या 100 नगरपरिषदा/ पंचायती अश्या एकूण 339 नगरपरिषदा/पंचायतींपैकी त्या त्या प्रवर्गाच्या एकूण लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी 44, अनुसूचित जमातीसाठी 16, नागरीकांचा मागास प्रवर्ग 92 आणि खुल्या प्रवर्गासाठी 187 जागांचे आरक्षण आहे.
त्यापैकी नव्याने निर्मिती 100 नगरपरिषदा/पंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 6, नागरीकांचा मागास प्रवर्ग 27 आणि खुल्या प्रवर्गासाठी 54 जागांचे आरक्षण आहे. या आरक्षणातील 50 टक्के पदे ही महिलांसाठी आरक्षित आहे. त्यांची सोडत आज काढण्यात आली.
नव्याने निर्मिती 100 नगरपरिषदा/पंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी  राखीव 13 नगरपंचायतीपैकी तिवसा, माळशिरस, अर्जूनी, सावली, लाखनदूर व नायगांव या 6 नगरपरीषदा महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहे.
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या  6 नगरपंचायतीपैकी  धडगांव वडफाळया, सुरगाणा, झरी झामणी या 3 नगरपालीका महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.
नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी अहेरी, फुलंब्री, शिरुर कासार (बीड), पारनेर, वाशी, औंढा नागनाथ, मोहोळ, देवरी, जळकोट, अक्कलकुवा, कसई दोडामार्ग, म्हसाळा, कुही, देवणी, राळेगाव, बाभुळगांव, शहापूर, गोंड पिंपरी, दिंडोरी, धानोरा, लाखनी, मोहाडी, संग्रामपूर, साक्री, लोणंद, लोहार बु. वडवणी या 27 नगरपरीषदा राखीव झाल्या आहेत
नागरीकांचा मागास प्रवर्गासाठीच्या 27 जागांपैकी अहेरी, पारनेर, वाशी, देवरी,  देवणी, बाभुळगांव, शहापूर,  धानोरा, लाखनी, मोहाडी, साक्री, लोहार बु., वडवणी या 13 नगरपरीषदा महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत.
खुल्या प्रवर्गातील 54 नगरपरिषदांपैकी हिंगणा, देवळा, शिरुर अनंतपाळ (लातूर), मोताळा, जाफ्राबाद, भातकुळी, पाटोदा, घनसावंगी, चामोर्शी, मानोरा, तळा, जामखेड, बार्शी टाकळी, मारेगाव, कारंजा (वर्धा), बदनापूर, चाकण, गोरेगाव, मंडणगड, कळवण, एटापल्ली, खालापूर, पोलादपूर, धारणी, चिमूर, मंठा, कोरपना, सालेकसा या 28 नगरपरीषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर उर्वरित 28 नगरपरीषदा या खुला प्रवर्गासाठी आहेत.
या सोडतीस राज्यभरातील नगरपरीषदांचे नवनिर्वाचित पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top