खेड(पुणे सुपरफास्ट न्यूज)-
खेड तालुक्यातील भामा - आसखेड़ धरणातून उजनी मधे पाणी सोडण्याचे निषेधार्थ भाम खोऱ्यातील शेतक-यांनी आज सकाळी भामा आसखेड़ धरणावर आंदोलन करून येथिल भामा-आसखेड़ सिंचन व्यवस्थापन चे उपअभियंता गणेश हासे यांचे कार्यालयाला टाळे ठोकले.
यावेळी भाजपचे शरद बुट्टेपाटील,हिरामण कोळेकर,रामदास कोळेकर,विश्वास शिवेकर,मारूती कोळेकर, यांचेसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे सत्तेत असताना ही भाजप ला  भामा असखेड् धरना वर आशा प्रकारे आंदोलन करावे लागत आहे.


 
Top