औरंगाबाद ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -
येत्या ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्याआधी म्हणजे 7 डिसेंबरआधीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
येत्या ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. त्याआधी म्हणजे 7 डिसेंबरआधीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
भाजप, शिवसेना आणि घटक पक्षांची उद्या यासंदर्भात बैठक होणार
आहे. दरम्यान सध्याच्या मंत्रिमंडळातून कुणलाही वगळण्यात येणार नसल्याचं
समजतं आहे. बुधवारी सर्व मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित
प्रदेशाध्यक्षांच्या घरी बैठक होणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारला एक वर्ष झालं तरीही घटक पक्षांना
मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. याबाबत घटक पक्षांच्या नेत्यांनी
अनेकदा नाराजीही व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळात तरी घटक
पक्षांना स्थान मिळेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.