नवी दिल्ली ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -
बिहार निवडणुकीतील पराभवानंतर भाजपच्या ज्या नेत्यांनी पक्षातील मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवला होता, त्यांच्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचाही समावेश होता. ‘अच्छे दिन’च्या प्रश्नावर अडवाणी म्हणाले, जर योग्य दिशा असेल तर चांगली व्यवस्था आणण्यास थोडा कालावधी जाईल.
दरम्यान, गुजरातमध्ये अहमदाबादसह 6 महानगरपालिकांच्या
निवडणुकांसाठी आज मतदान सुरु आहे. तर 31 जिल्हा पंचायती, नगरपंचायतींसाठी
29 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मोदींच्या गैरहजेरीत पहिल्यांदा
गुजरातमध्ये मोठ्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे गुजरात भाजपसह मोदींचीही
परीक्षा मानली जात आहे.
बिहार निवडणुकीतील पराभवानंतर भाजपच्या ज्या नेत्यांनी पक्षातील मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवला होता, त्यांच्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचाही समावेश होता. ‘अच्छे दिन’च्या प्रश्नावर अडवाणी म्हणाले, जर योग्य दिशा असेल तर चांगली व्यवस्था आणण्यास थोडा कालावधी जाईल.
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये नव्या उमेदीनं काम
केलं जात असून यापुढे कोणतीही कसर सोडली जाणार नाही. गुजरातमधील
महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान करायला खानपूरच्या सी. यू. शाह कॉलेजच्या
मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर अडवाणी बोलत होते.
डाळींच्या किंमतींवरील प्रश्नावर अडवाणी म्हणाले, “चांगली
व्यवस्था आणण्यासाठी काही काळ जातो आणि दिशा योग्य असेल तर परिणामही
दिसतात.”