पुणे ( पुणे सुपरफास्ट न्युज )- हडपसरजवळील मस्तानी तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. मस्तानी तलावात एकूण 5 तरुण पोहण्यासाठी आले होते. त्यातील तिघांना पोहता येत असल्याने बाहेर निघाले, तर पोहता येत नसलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री एकूण 5 जण पार्टी करुन सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मस्तानी तलावात पोहण्यासाठी पाण्यात उतरले. त्यानंतर ही दुर्घटना घडली. या तरुणांनी मद्यप्राशन केल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाकडून तलावात बोट उतरवण्यात आली असून दोघांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे. मृतांपैकी एकाचं नाव सुनील गायकवाड असल्याचीही माहिती मिळते आहे

 
Top