पुरंदर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - जिल्ह्यात बहूतेक ठीकाणी डेंग्यू व डेंग्यू सदृश्य ताप रूग्ण आढळत असल्याने जनतेला किटकजन्य आजारांबद्दल सर्वकश माहिती होणे आवश्यक असल्याचे मत माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैध्यकीय अधिकारी डाॅ.विवेक आबनावे यांनी पिसे गावातील साथ नियंत्रना समयी केले.
     ते पुढे म्हणाले कि पिसे गावात डेंगुचे रुग्ण सापडले असले तरी ग्रामस्थांनी घाबरुन जाता कामा नये. डेंग्यू ताप उद्रेक हा वापराच्या साठवलेल्या पाण्यात एडीस इजिप्ती जातीच्या डास उत्पत्ति ने होत असल्याने जनतेने साठवलेले पाणी झाकूण ठेवणे आवश्यक आहे.डासांची अंडी ते अळी व पुर्ण वाढ झालेला मच्छर होणे करीता आठ ते दहा दिवस लागतात.जर दर आठवड्याला एक दिवस कोरडा दिवस पाळल्यास डास नियंत्रण होउ शकते.
डास घराजवळील गवत तसेच इतर अनावश्यक झूडपात वाढत असल्याने परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
डास आळ्या नष्ट करण्याकरीता आरोग्य खात्याकडील पुरवलेल्या टेमिफाॅस औषधाचा,  कर्मचारी यांचे मदतीने वापर करावा.
पुर्ण वाढ झालेल्या मच्छराला नष्ट करणे करीता घरामध्ये धुराळणी करूण घेणे आवश्यक आहे.
घरात ताप रूग्ण असल्यास त्वरीत जवळच्या रूग्णालयात उपचार घेणे आवश्यक आहे.रक्तातील प्लेटलेटस कमी होण्याचा धोका ओळखण्या करीता प्लेटलेटस तपासणी आवश्यक आहे.
वैद्यकिय सल्याशिवाय कोणतेही चुकीचे औषध घेणे टाळावे.डास अळी नष्ट करणेकरीता गप्पी मासे साठवलेल्या पाण्यात सोडावे.वरील सर्व उपायांचा वापर करण्याचे आवाहन जि.प.सदस्य तसेच कृषी व पशु संर्वधन सभापती सारीकाताई इंगळे यांनी ग्रामस्थांना केले आहे.पिसे येथील साथ नियंञणात आलीआहे. हे तालुका वैद्यकिय अधिकारी तसेच गट विकास अधिकारी पुरंदर व जिल्हा परीषद पुणे यांचे मार्गदर्शणाखाली होत आहे.यामुळे या गावातील डेंगुचे व डेंगु सद्रुष रुग्ण आटोक्यात आणण्यात मदत झाली.


 
Top