जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - विधानसभेच्या निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाल्याने
जुन्नर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा लेखाजोखा आमदार शरद
सोनावणे यांनी "पुणे सुपरफास्ट न्यूज " शी बोलताना सादर केला. यामध्ये
केलेली विकासकामे व मार्गी लावलेले प्रश्न त्याचबरोबर विधासभेत उपस्थित
केलेल्या प्रश्नासंदर्भात आढावा घेण्यात आला आहे. आरोग्य,रस्ते व
पर्यटनासंदर्भातले विविध प्रश्न मार्गी लागले असून प्रलंबित प्रश्नांसाठी
पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी आमदार शरद सोनावणे यांनी सांगितले आहे.
याविषयी सविस्तर बोलताना आमदार शरद सोनवणे म्हणाले," केंद्रीय
मार्ग निधीतून प्रजीमा -१५६ निमदरी ते गुंजाळवाडी ते वारूळवाडी रस्ता
रुंदीकरण व सुधारणा (१२ कि. मी.) सुमारे ९ कोटी रुपये,प्रजिमा -८ राष्ट्रीय
महामार्ग ५० ते साळवाडी ते बोरी बेल्हे रस्ता रुंदीकरण व सुधारणा (८
कि.मी.) रुपये ६ कोटी यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
यांचाकडे विशेष पाठ पुरावा केला व त्यांनी यासाठी मंजुरी दिली असून सदर
प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून २ कोटी
५२ लाख रुपयांची कामे तर राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत ७०
कुटुंबाना १४ लाख रुपये आर्थिक मदत,संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुमारे
४०० कुटुंबातील निराधार व्यक्तींना सुमारे ४९ लाख रुपये आर्थिक मदत,अवकाळी
पाऊस व अतिवृष्टीमह्ये बाधित शेतकऱ्यांना सुमारे ९ कोटी रुपयांचा निधी
मिळवून दिला.जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून रु. ३ कोटी २५ लाख रुपये
रस्त्यांची कामे, साकव पुलांची १ कोटी ३५ रुपयांची कामे तर आदिवासी
भागासाठी ३ कोटी २५ रुपयांची रस्त्यांची कामे प्राधान्याने मंजूर केली केली
आहे. शिवनेरी सह जुन्नर तालुक्यातील आठही गडांचे क्लस्टर करून पर्यटन
क्षेत्र विकसित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून त्यासंदर्भात
पाठपुरावा सुरु आहे. त्याचबरोबर राज्यातील गडांचा विकास व जतन करण्यासाठी
किल्ले संवर्धन महामंडळ स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्याच्या विविध भागात सुमारे १२ कोटी ५०
लाख रुपयांची कामे सुरु असून येत्या २ वर्षात जुन्नर तालुका tankar मुक्त
करण्याचा संकल्प आहे.अष्टविनायक तीर्थक्षेत्र निधीतून जुन्नर तलुक्यातील
श्री क्षेत्र लेण्याद्री व ओझर या दोन तीर्थ क्षेत्रांकडे जाणाऱ्या समन्वय
रस्ता सुधारणेसाठी सुमारे ४१ कोटी रुपये मंजुर झला असून असून सदर प्रक्रिया
अंतिम टप्प्यात आहे.श्री क्षेत्र पारुंडे येथे नुकताच पार पडलेल्या
कुंभमेळ्यासाठी ९ कोटी मंजूर झाला असून सुमारे ५ कोटी रुपयांची कामे पूर्ण
झाली असून उर्वरित कामे पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहेत.तसेच किल्ले
शिवनेरी परिस विकास अंतर्गत सुमारे ५ कोटी ३५ लाख रुपयांची कामे
प्रगतीपथावर व निविदा स्तरावर आहेत.१८ सप्टेंबर २०१५ रोजी जुन्नर तालुक्यात
झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलांची मोठ्या प्रमाणात झाली असून सदर भागांतील
पुलांची कामे तातडीने होणे आवशयक असल्यामुळे पूरहानी कार्यक्रम अंतर्गत ५
कोटी १० लाख रुपयांचा निधी प्राप्त होण्यासाठी पाठपुरावा केला असून सदर
निधी लवकरच प्राप्त होणार आहे.५०५४ राज्य मार्ग व नाबार्ड अंतर्गत सुमारे ६
कोटी ६० लाख रुपये रस्ता सुधारणेसाठी राज्य शासनाकडे विशेष पाठ पुरावा
केला असून सदर प्रक्रिया मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
तसेच विधानसभेच्या विविध अधिवेशनातील वर्षभराच्या
कामकाजामध्ये अनेक प्रश्न उपस्थित करून प्रत्यक्ष चर्चेमध्ये सहभाग घेतला
आहे.यामध्ये बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्यासाठी विधानसभेत आवाज उठवून
केंद्रस्तरावर शासन परिपत्रकात सुधारणा करून या परिपत्रकातील जंगली
प्राण्यांच्या संज्ञेतुन बैल हा प्राणी वगळण्याची मागणी,सर्व शिक्षा अभियान
योजनेअंतर्गत राज्यात गेल्या २-३ वर्षांपासून वर्ग खोल्यांची बांधकामे व
शाळा संरक्षण भिंतींची बांधकामे बंद झालेली आहेत ती पुन्हा सुरु करण्यात
यावी यासाठी मागणी,जुन्नर तालुक्यातून जाणारा पुणे -नाशिक हा २४५ कि. मी.
लांबीचा रेल्वे प्रकल्प जलद गतीने मार्गी लावावा यासाठी राज्य व केंद्र
स्तरावर आग्रही मागणी, राज्यात सर्पदंशाने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या
कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी,नैसर्गिक आपत्तीमध्ये
राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीच्या पारंपारिक निकषांमध्ये सुधारणा
करण्याची मागणी,गारपिटीप्रमाणेच आंबा पिकालाही मदतीमध्ये समाविष्ट करावे व
आंबा उत्पादकानाही शासनाकडून मदत मिळावी हि आग्रही मागणी,मराठी भाषेला
अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याची मागणी या व यासारख्या अनेक महत्वपुर्ण
प्रश्नांवर समावेश आहे.( प्रतिनिधी -तुषार येवले )