जुन्नर नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादीची सरशी. ...सेनेला धक्का
      जुन्नर ( पुणे सुपरफास्ट न्युज )  -जुन्नर नगरपरिषद निवडणुकीत दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्हीही उमेदवार निवडून आले. तर सेनेला पराभवाचा धक्का बसला आहे.
      प्रभाग क्र .2 मधून वृषाली काजळे तर प्रभाग क्र. 4 मधून परविन हमिद मोमिन विजयी झाल्या.
          तालुक्यात शिवसेनेची चांगली ताकद असताना झालेल्या हा पराभव  सेनेच्या जिवारी लागण्याची शक्यता आहे. मागील काही निवडणुकांमध्ये शिवसेनेनी आपल्या कट्टर विरोधी पक्षाशी केलेली युती बहुतेक जनतेला आवडली नसावी. आणि राष्ट्रवादी च्या विजयाचे कारण आपण पाहिले असता जुन्नर नगरपरिषद मध्ये राष्ट्रवादी आणि मनसे या युती ने केलेली विकासकामे याची पोच पावती जुन्नर शहरातील जनतेनी मतदान रूपाने दिली आहे. ( प्रतिनिधी - तुषार येवले )
 
Top