पिंपरी ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - पिंपरीगावात
फैब्रिकेशन दुकानाला आज (सोमवारी) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीगाव येथील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या बालामन चाळीतील रोहन फैब्रिकेशन या दुकानाला आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले.
या आगीत दुकानातील 5 मोठी कपाटे व रंगाचे 10 ते 12 डब्बे असा एकूण 80 हजार रुपयांचे नुकसान या आगीत झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही
 
Top