बुलढाणा ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - इथले सगळे मराठा पुढारी चोर आहेत, काहींनी सहकार क्षेत्र लूटलं तर काहींनी शेतकऱ्यांच्या येणाऱ्या योजनाच खाल्ल्या, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सावध राहा, असे धक्कादायक विधान भारिप बहुजनमहासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
  आरएसएसला आरक्षणाचे समीक्षण करायचे आहे. ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे आणि त्यांना ते शक्य आहे, कारण ओबीसीला आरक्षण हे मंडल कमिशन मार्फत आलेले आहे.मंडल आयोगाचे समीक्षण करुन ओबीसी आरक्षण संपवलं जाऊ शकते. म्हणूनच, ओबीसीने स्वत:च्या आरक्षणासाठी आता लढायला सज्ज झालं पाहिजे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. बुलडाण्यात धम्म चक्र प्रवर्तन मेळाव्याला आंबेडकर बोलत होते
 
Top