बिहार ( पुणे सुपरफास्ट न्युज )  - आरोप प्रत्यारोपाने गाजत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या  मतमोजणीत सुरवात झालेली आहे काही वेळातच संपूर्ण निकाल हाती येतील , मात्र सुरवातीला येत असलेल्या निकालावरून तरी भारतीय जनता पक्ष जोरदार मुसंडी मारत आहे ,  मतमोजणीत विधानसभेच्या २४३ जागेपैकी तब्बल ९८  हून अधिक जागेवर भाजप पुढे आहे. नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव याचा राजद व आरजेडी ८९  हून अधिक जागेवर पुढे आहे. मतमोजणीत चांगली कामगिरी होत असल्याचे पाहून भाजपमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.


भाजपची ही मुसंडी पाहून पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. संपूर्ण निवडणुकीत पक्षाने प्रचारापासून दूर ठेवलेले भाजपचे खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे आरजेडी व जदयू यांचा विजय होईल आणि महागठबंधनचे नेते नितीशकुमार हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त करत आहेत. बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या १२२ जागा कोण गाठेल याकडे सर्वांचे लक्ष्य लागलेले आहे , महाआघाडी सुद्धा राहिलेल्या जागांवर मुसंडी मारेल असा सूर सुद्धा आता येऊ लागलाय.त्यामुळे सत्तेत कोणीही आले तरी विरोधी पक्ष सक्षम असेल हे मात्र नक्की .

 
Top