उस्मानाबाद ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - जिल्ह्यात आरोग्य यंत्रणातील भ्रष्ट्र कारभार पुन्हा उघड झाला आहे .  40 हजारची लाच घेताना निवासी वैद्यकिय अधिकारीला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे .
उस्मानाबाद जिल्हा सरकारी रुग्णालयमधील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन रामढवेला सहकारी असलेल्या एका डॉक्टरचे थकीत पगार काढ़ण्यासाठी अणि बदली  करण्यासाठी लाच घेताना अटक केली आहे . 55 हजराची मागणी करून 40 हजारची लाच घेताना रंगेहात पकडले .
राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत पालकमंत्री असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात आरोग्य यंत्रणाचा भ्रष्ट कारभार उघड झाला आहे . या घटनानंतर आरोग्य यंत्रणाचे धिंधोडे निघाले आहेत . डॉक्टरच सहकारी डॉक्टरकडून लाच घेत असेल तर सामान्य रुग्णाची काय हाल व पिळवनुक होत असेल हे स्पष्ट जाल आहे . उस्मानाबाद लाच लुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक अश्विनी भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली .
 
Top