बारामती ( पुणे सुपरफास्ट न्युज ) - राज्यातील अंदाजे दोन लाख शेतकरी भेट देण्याची शक्यता
असलेल्या बारामती कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 6 ते 8
नोव्हेंबर दरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
बारामती कृषी विज्ञान केंद्राकडून 110 एकर जागेत प्रदर्शन
भरवले जात आहे. देशातील विविध कृषी तंत्रज्ञानाची सर्वात मोठी
प्रात्यक्षिके यावेळी बघण्यास मिळतील. 350 कंपन्या किंवा संस्था यात सहभागी
होत असल्यामुळे शेतक-यांना परिपूर्ण माहिती मिळेल, अशी माहिती आयोजकांनी
दिली.
प्रदर्शनात शेतक-यांना थेट शेतात जावून फळे,पिके,फुले,भाजीपाला लागवडीची माहिती मिळणार आहे. पशुपालन,पोल्ट्री,दुग्धव्यवसाय, फळप्रक्रिया,रेशीमशेती याविषयावर शेतक-यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
शेतक-यांसाठी हे प्रदर्शन मोफत असून तीन दिवस विविध
चर्चासत्रांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. राज्याचा कृषी विभाग तसेच
नाबार्ड देखील या उपक्रमात सहभागी होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री
शरद पवार यांना प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
शेतक-यांना या प्रदर्शनाच्या भेटीसाठी मार्गदर्शन हवे असल्यास 02112 255207
या क्रमांकावर संपर्क साधता येईल.